फुलं
फुलं रंगांची कथा, फुलं गंधाची गाथा. फुलं लावण्याची लेणी, फुलं नाचणारी गाणी. फुलं प्रीतीचा आधार आणि फुलांतून समर्पणही साकार. प्रेमभरली भेट फुलं, सत्काराला फुलं आणि पूजेला फुलं... फूल नसेल तर पाकळी चालेल अशी अवस्था. फुलं भक्तीचाही उत्सव. फुलाचं आख्यान, फूलच नायक, फूलच निरुपणकार. जीवनातील नाट्य समजावून सांगणारी. आजूबाजूच्या कशाचीही तमा न बाळगता, आकाशाकडून लाभणारं ऊन, पाऊस, चांदणं अंगावर झेलीत स्वत्व जपणारी. प्रत्येक ऋतूचा चरित्रग्रंथ उलगडून दाखविणारी. आपल्या आविर्भावांनी जीवनाचं वाहतेपण, गतिमानता प्रकट करणारी. शरदिनी डहाणूकर