पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फुलं

फुलं रंगांची कथा, फुलं गंधाची गाथा. फुलं लावण्याची लेणी, फुलं नाचणारी गाणी. फुलं प्रीतीचा आधार आणि फुलांतून समर्पणही साकार. प्रेमभरली भेट फुलं, सत्काराला फुलं आणि पूजेला फुलं... फूल नसेल तर पाकळी चालेल अशी अवस्था. फुलं भक्तीचाही उत्सव. फुलाचं आख्यान, फूलच नायक, फूलच निरुपणकार. जीवनातील नाट्य समजावून सांगणारी. आजूबाजूच्या कशाचीही तमा न बाळगता, आकाशाकडून लाभणारं ऊन, पाऊस, चांदणं अंगावर झेलीत स्वत्व जपणारी. प्रत्येक ऋतूचा चरित्रग्रंथ उलगडून दाखविणारी. आपल्या आविर्भावांनी जीवनाचं वाहतेपण, गतिमानता प्रकट करणारी.                     शरदिनी डहाणूकर

प्रार्थना

"प्रार्थनेमुळे परिस्थिती बदलत नाही. पण प्रार्थनेमुळे माणसे बदलतात आणि बदललेल्या माणसांना प्राप्त परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य लाभते.'   ...........शांता शेळके